एक्स्प्लोर

Mumbai Drug Case : क्रूझवरील पार्टीसाठी परवानगी दिलीच कुणी? ड्रग पार्टी प्रकरणात मुंबई पोलीसांची एन्ट्री

Mumbai Drug Case : क्रूझवरील पार्टीसाठी परवानगी दिलीच कुणी? असा सवाल उपस्थित करत ड्रग पार्टी प्रकरणात मुंबई पोलीसांची एन्ट्री झाली आहे.

Mumbai Drug Case : शाहरुखचा मुलगा आर्यन खान ज्या ड्रग्ज पार्टीमुळे कोठडीत आहे, त्यात आता मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली आहे. कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, या पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पाच पेक्षा जास्त लोक याठिकाणी जमलेच कसे, याचा तपासही आता मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही याप्रकरणात कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या मुंबई पोलिसांनी विविध यंत्रणांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. 

दुसरीकडे एनसीबी मुंबई पथकाच्या मदतीला देशभरातली पथकं धावून आल्याचं कळतंय. कारण सकाळपासून गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्ली एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळं एनसीबीचं पुढचं ऑपरेशन काय असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ड्रग्जसाठी बिटकॉईन, डार्कनेटचा वापर

शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ज्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोठडीची हवा खावी लागतेय. त्या प्रकरणाची व्यापी फक्त दिल्ली-मुंबईपुरती मर्यादीत नाही, तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. क्रूझवर पार्टीसाठी जे ड्रग्ज आणण्यात आलं होतं, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला होता.  क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यन खानसह एकूण 8 जणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलंय. या तस्कराच्या चौकशीनंतर ड्रग्जसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याची माहिती मिळाली आहे. 

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. एनसीबीला संशय आहे की, क्रूझवर जे ड्रग्स आणण्यात आले होते. त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्टीचे आयोजक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

एनसीबीला माहिती मिळाली आहे की, एका प्रवाशांनं नशेत धुंद झाल्यानंतर क्रूझच्या खिडक्यांची तोडफोड केली होती, त्याला ताब्यात घेतलं होतं. एनसीबी सध्या चौकशी करत आहे की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला इथे कोणी आमंत्रित केलं होतं? तसेच आर्यनच्या मित्रांकडे सापडलेल्या ड्रग्ससाठी कोणी पैसे दिले होते? 

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारत दहाहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, काही जणांची रात्रीत चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 8 ते 10 जणांपैकी एक जण बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याचा मुलगा देखील असल्याची माहिती आहे. यात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जरी असलं तरी आज कुणालाही कोर्टात हजर केलं जाणार नसल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. सोबतच कोणालाही अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीत काय माहिती पुढे येते आणि बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाते का? हे पाहाणं महत्त्वाचे असणार आहे. सोबतच आणखी एका अभिनेत्याची मुलगी देखील यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाBig Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईटBig Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget