एक्स्प्लोर
मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस
या मागण्या मान्य झाल्या नाही तर 16 नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार, असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात सुरु असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. मात्र सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आंदोलकांची प्रकृती खालावत असून एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरक्षणाची मागणी सरकारने लवकर मान्य करावी. आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
- मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत,
- आंदोलकांवरील दंगलीचे गुन्हे मागे घेणे
- सारथी संस्थेच्या अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा
- मागास आयोगाचा अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबरला असल्याने येत्या अधिवेशनात ठराव मंजूर करुन केंद्राकडे पाठवा
या मागण्या मान्य झाल्या नाही तर 16 नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार, असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.
दरम्यान, येत्या 26 नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही. मराठा समाजात फूट पाडण्याचं राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या 16 तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement