एक्स्प्लोर
मुंबईतील दादरमधील उच्चभ्रू परिसरात खुलेआम देहविक्री
मुंबई: दादर... मुंबईतलं अतिशय महत्त्वाचं आणि मध्यभागी असलेला परिसर. पश्चिम आणि मध्य मुंबईला जोडणाऱ्या दादरमध्ये अनेक महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. मात्र याच दादरला आता वेश्या व्यवसायाचं ग्रहण लागलं आहे.
दादर... मुंबईचं सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक केंद्र. पण हेच दादर आता वेश्या व्यवसायाचं देखील केंद्र बनत चाललं आहे. तेही पोलिस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या आशीर्वादानं.
दादरमधील उच्चभ्रू परिसरात वेश्याव्यवसाय सुरु असतो. तर ज्यांना वेश्या परवडत नाही त्यांच्यासाठी तृतीयपंथीय देखील उपलब्ध असतात. याचाच पर्दाफाश एबीपी माझाच्या टीमनं केला आहे.
आम्ही सुरुवातीला पोहोचलो दादरमधील प्रसिद्ध महाविद्यालय डी.जी.रुपारेलजवळ. बाहेरून चकचकीत दिसणारं सत्कार हॉटेल आतून मात्र कित्येक वर्षांपासून वेश्या व्यवसायाचं केंद्र बनलं आहे. बाहेर उभ्या असलेल्या वेश्यांबरोबर आमच्या प्रतिनिधीनं आधी ग्राहक बनून चर्चा केली.
नंतर आम्ही हॉटेल मध्येही घुसलो. छोट्याश्या जागेत एका माणसाला झोपता येईल एवढंच कम्पार्टमेंट, अशी दुतर्फा बनलेली व्यवस्था करण्यात आली आहे. सेवा पुरविणारा कर्मचारी वर गेल्यानंतर अचूक मार्गदर्शन करतो.
पोलिस आणि प्रशासनाला हप्ते पुरविणाऱ्या हॉटेलला भिडण्यासाठी इथले रहिवासी देखील घाबरतात.
हा झाला बंद खोलीतला गोरखधंदा. पण याच्याच बाजूला उघड्यावरही असाच धंदा चालतो, बाहेरून रंग-रंगोटी केलेलं महानगरपालिकेचं जी- उत्तर विभागातील कचरा व्यवस्थापनाच्या कार्यालयाच्या मागे निरोधांचा खच पडलेला पाहायला मिळतो. कारण इथं तृतीयपंथीयांचा व्यवसाय चालतो.
ज्यांना सत्कार हॉटेल परवडत नाही ते लागलीच या कार्यालयाची वाट धरतात. या गोरखधंद्याला प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचं तृतीयपंथी मान्य करताता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना पैसे देत असल्याचं हे तृतीयपंथी सांगतात.
नेहमी या रस्त्यावर वावरणाऱ्या पोलिसांना हा सगळा प्रकार माहित नाही असं होणार नाही.
इथं आहे सर्वांच्या ओळखीचा सेनापती बापट मार्ग, समोरच माटुंगा रोड रेल्वे स्टेशन, बाजूला डी.जी. रुपारेल कॉलेज तर समोर रुईया महाविद्यालय, हाकेच्या अंतरावर शिवसेना भवन आणि राजगड, जागोजागी पोलीस चौक्या, दहा मिनिटांच्या अंतरावर शिवाजी पार्क. या सर्वांच्या गराड्यात अगदी निवांतपणे हे व्यवसाय चालतातच कसे? याचं मात्र आश्चर्य आहे.
वेश्या असतील किंवा तृतीयपंथीय दोघांकडे समाजाने सहानुभूतीनं बघीतलं पाहिजे. परंतु याचाच फायदा घेत समाजातील व्हाईट कॉलर समजले जाणाऱ्या विशेष म्हणजे सरकारी बाबूंनी त्यांचा फायदा घेऊन स्वत: धंदा करावा या पेक्षा दुसरी शोकांतिका नाही. मुंबईच्या पोटात अशी किती ठिकाणं असतील आणि त्याच्यापासून महापालिका कर्मचाऱ्यांची एकूणच अतिरिक्त कमाई किती असेल हा मात्र संशोधनाचा विषय नक्कीच आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
राजकारण
विश्व
Advertisement