एक्स्प्लोर
Mumbai News : स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून पोलिसानं संपवलं जीवन, भायखळा कारागृहाबाहेर घडली घटना
Mumbai News : मुंबईच्या भायखळा (Byculla) कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Police committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.
Mumbai News : मुंबईच्या भायखळा (Byculla) कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Police committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मध्ये कार्यरत होते.
श्याम वरगडे यांची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागपाडा पोलीस दाखल झाले. वरगडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या हवालदाराने एवढं टोकाचं पाऊल का उचललं? या संदर्भात आता नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement