Mumbai Crime News : 20 वर्षीय गरोदर महिलेचा गळा आवळून खून, पतीचा मावस भाऊ अटकेत
आरोपीनं आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा हाताने गळा आवळून खून केला.
Kurla : एका 20 वर्षीय गर्भवती महिलेची हत्या केल्याप्रकरणी कुर्ला (Kurla) पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अर्जुन सोनकर हा मृत महिला यांचा पतीचा मावस भाऊ आहे. आरोपीनं आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा हाताने गळा आवळून खून केला.
पोलीस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सोनकर 25 असे फिर्यादीचे नाव असून ते मृत कोमल 20 हिचे पती आहेत. ते इंदिरा नगर झोपडपट्टीत, आरिफ हॉटेलच्या मागे, परीगवाडी, कुर्ला पश्चिम येथे राहतात. संजय आणि अर्जुन हे मावस भाऊ असून दोघेही येवले अमृततुल्य चाईच्या दुकानात कॉटन ग्रीनमध्ये काम करतात.
आरोपी अर्जुन हा गेल्या काही महिन्यांपासून या दाम्पत्यासोबत राहत होता. 15 दिवसांपूर्वी तो दुसरीकडे कुठेतरी राहत होता. मृत कोमल ही गर्भधारणेसाठी तिच्या मूळ गावी जाणार होती. आरोपींनी तिला न जाण्यास सांगितले. जोरदार वाद झाल्यानंतर त्याने तिचा हाताने गळा दाबून खून केला, असे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, मृत कोमल ही वन प्लस वन स्ट्रक्चरमध्ये पहिल्या मजल्यावर राहायची. तिने मच्छी विकनारा त्यांच्या ठिकाणी आला की माहिती देण्यास खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीला सांगितले. त्याप्रमाणे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं तिला हाक मारण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद न मिळाल्याने ती व्यक्ती वरती गेली. त्या व्यक्तीनं कोमलला जमिनीवर पडलेलं पाहिलं. शेजाऱ्याने इतरांना आणि घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास सुरू केला.
काही शेजाऱ्यांनी अर्जुनला घरी येताना पाहिले होते. त्यामुळे पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानं घडलेली घटना सांगितली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "जवळच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील अर्जुन दिसत होता.'
कुर्ला पोलिसांनी अर्जुनवर कलम 302 आणि 316 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि मयत यांचे अनैतिक संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून त्यामुळेच आरोपीने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.
संबंधित बातम्या :