एक्स्प्लोर

Crime : आईशी झालेल्या किरकोळ वादातून चार वर्षीय चिमुरड्याची हत्या, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

Crime in Ulhasnagar : चिमुरड्याच्या आईशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपी कांचनसिंग पासी याने चिमुरड्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे

 उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका  चार वर्षीय चिमुरड्याचा शेजाऱ्याने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत मोहित (नाव बदलले आहे) या चिमुरड्याच्या आईशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपी कांचनसिंग पासी याने चिमुरड्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी कांचनसिंग पासी याला प्रयागराग रेल्वे स्टेशनहून अटक केली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नंबर दोन भागात अमरसिंह ठाकुर हे पत्नी आणि मुलांसह राहतात. मागील आठवड्यात आरोपी कांचनसिंग याचे मृत मोहितच्या आईशी शुल्लक कारणावरून वाद झाले होते. यावेळी आरोपीला मारहाण देखील करण्यात आली होती. याचा राग आरोपी कांचनसिंगच्या मनात होता.  त्याने याचा सूड घ्यायचे ठरवले आणि 20 एप्रिल रोजी मोहितचे अपहरण केले. अपहरण करून या चिमुरड्याला कांचन सिंग हा उत्तर प्रदेश या आपल्या मूळ गावी घेऊन निघाला होता. मात्र वाटेत मुलाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे कांचनसिंग याने या मुलाला अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका निर्जन स्थळी नेत  गळा दाबून हत्या केली. शिवाय कोणाला कळू नये म्हणून त्याने मोहितचा मृतदेह झाडाझुडपात लपवला. 

दरम्यान तीन ते चार दिवसानंतर ऑर्डनन्स भागात स्थानिकांना मृतदेह आढळून आल्यावर त्यांनी अंबरनाथ पोलिसांना याची माहिती दिली. अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनादठी पाठवला. दरम्यान उल्हासनगर पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास सुरू केला होता. तपासा दरम्यान मोहितच्या आईशी काही दिवसांपूर्वी कांचनसिंग या शेजाऱ्याचे वाद झाले होते ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हा धागेदोरा मिळताच कांचन सिंग यांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले. त्याच्या मोबाईल फोनच्या लोकेशनच्या माध्यमातून कांचन सिंग उत्तर प्रदेशला जात असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उल्हासनगर पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशच्या प्रयागराग रेल्वे स्टेशन वरून कांचन सिंगला ताब्यात घेतलं. यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने मोहितच्या हत्येची कबुली दिली.

 दरम्यान याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी कांचन सिंगला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

महत्त्वाच्या बातम्या

भूलतज्ञ डॉक्टरला राहत्या फ्लॅटवर निर्घृण पद्धतीनं सपवलं, अवघ्या आठ वर्षाचा मुलगा सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात अन् डॉक्टर बायको प्रियांका निवांत बसून मृतदेहाजवळ मोबाईल स्क्रोल करत राहिली
भूलतज्ञ डॉक्टरला राहत्या फ्लॅटवर निर्घृण पद्धतीनं सपवलं, अवघ्या आठ वर्षाचा मुलगा सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात अन् डॉक्टर बायको प्रियांका निवांत बसून मृतदेहाजवळ मोबाईल स्क्रोल करत राहिली
Latur Crime News: 'प्रथमदर्शनी घातपात नाही, पण...'; लातूरमधील डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून महत्त्वाची माहिती
'प्रथमदर्शनी घातपात नाही, पण...'; लातूरमधील डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून महत्त्वाची माहिती
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
तुकाराम मुंढेंच्या खात्याचा मोठा प्रहार; अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले
Jejuri Warkari Accident Deaths : जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
अचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
अचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Embed widget