एक्स्प्लोर

Yavatmal : गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा नरबळीचा प्रयत्न, मुलीच्या सतर्कतेमुळे पोलीस मदतीला, अनर्थ टळला

यवतमाळमधील बाभुळगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली असून मुलीच्या सतर्कतेमुळे पोलीस वेळेवर मदतीला धावले आणि मोठा अनर्थ टळला.

यवतमाळ: गुप्तधनाच्या लालसेपोटी एका नराधम वडिलाने पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीच्या सतर्कतेमुळे पोलीस वेळेवर पोहोचल्याने होणारा अनर्थ टळला. ही घटना बाभुळगाव तालुक्यातील मादणी येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी त्या मुलीच्या वडिलासह आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसापासून मुलीचा वडील हा गुप्तधनाच्या मागे लागला होता. घरी गुप्तधन असल्याचे सांगून बाहेरगावची मंडळी बोलावून पूजापाठ करण्याचा डाव त्याने आखला. त्यासाठी त्याने विजय बावणे, रमेश गुडेकार यांच्यासह राळेगाव येथील वाल्मिक वानखेडे, विनोद चुणारकर,  दिपक श्रीरामे, आकाश धनकसार, माधुरी ठाकूर, माया संगमनेरकर यांना मादणी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास बोलावून घेतले. घरातील पत्नी व दोन मुलींना एका खोलीत बंद करून दुसऱ्या खोलीत पूजापाठ करण्यास सुरूवात केली. 

पूजापाठ दरम्यान मुलीचा वडील हा सतत वाल्मिक नावाच्या मांत्रिकाशी बोलत होता. त्यावेळी त्याला गुप्तधनासाठी नरबळी द्यावा लागेल असे सांगण्यात आले. तेव्हा तो मोठ्या मुलीचा नरबळी देण्यासाठी तयार झाला. हा सर्व प्रकार मोठी मुलगी लपून पाहत होती. तिला संशय आल्याने तीने आपल्या मोबाईलमध्ये गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्डयाचा फोटो काढून आपल्या यवतमाळ येथील मित्राला पाठविला. त्यासोबत 'माझा गुप्तधनासाठी बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव'असा संदेश पाठवला.  

त्या मित्राने यवतमाळ येथील आपल्या पोलीस मित्राला माहिती दिली. त्यावरून ताबडतोब हालचाली करून बाभुळगाव पोलीस आणि यवतमाळ पोलिसांनी संयुक्तरित्या मादणी येथे घटनास्थळी धाड टाकली. यातील सर्व नऊ जणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. मुलीने दिलेल्या तक्रारीववरून पोलिसांनी वडिलांसह आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पोलिसांनी मादणी येथे गुप्तधनासाठी सुरू असलेला प्रकार उधळून लावला. यावेळी खड्डा खोदण्याचे साहित्य जसे कुदळ, फावडे, टिकास, टोपले, पूजेचे साहित्य, चाकू, सुरी आदी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र जेधे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी, सागर बेलसरे, आषिश अवजाडे करत आहे.

मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तिचा वडील तिच्यावर अल्पवयीन असल्यापासून शारिरीक संबंध ठेवायचा. ती बाहेरगावी शिकत असल्याने सुटीमध्ये घरी आल्यानंतर  तिच्यावर अत्याचार करीत होता. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. आई सतत आजारी असल्याने त्याचा फायदा वडील उचलत होता. यातून घरात नेहमी वादविवाद व्हायचे. त्यामुळेच वडिलाने मुलीचा नरबळी देण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीपुढे त्याचे काहीच चालले नाही. मुलीच्या सतर्कतेमुळे हा घाणेरडा प्रकार उजेडात आला.

पोक्सोसह जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
नराधम वडिलावर भादंविच्या कलम 376 (2)(एन) यासह इतर आठ जणांवर कलम 354, 307, 323,506, 34, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 4,6,10 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 4 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Chandrakant Patil | निमंत्रण स्वीकारूनही गैरहजेरी! चंद्रकांत पाटलांवर आठवले नाराजPune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटकAndheri Subway Water Logging : अंधेरी सबवे पुन्हा तुंबला! पाच फूट पाणी भरल्यानं सबवे बंदCity 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Embed widget