Mumbai Corona Cases : मुंबईत शुक्रवारी 251 रुग्णांची नोंद, 401 कोरोनामुक्त
Mumbai corona cases : राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये 2,085 सक्रिय रुग्ण आहेत.
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज 251 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,25,780 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,717 झाली आहे. सध्या मुंबईत 2,085 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 251 रुग्णांमध्ये 233 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2534 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 9, 2022
9th September, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/lZOOnreMgw
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2085 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1721 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1532 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 158, रायगड 281, रत्नागिरी 74, सिंधुदुर्ग 36, सातारा 62, सांगली 77, कोल्हापूर 75, सोलापूर 32, नाशिक 186, अहमदनगर 99, धुळे 12, औरंगाबाद 29, जालना 26, लातूर 51, नांदेड 16, उस्मानाबाद 35, अमरावती 14, अकोला 27, वाशिम 21, बुलढाणा 22, नागपूर 138, भंडारा 13, गडचिरोली 24 आणि चंद्रपूरमध्ये 161 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 7,061 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 955 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज 955 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 972 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.
संबंधित बातम्या