एक्स्प्लोर
बेस्ट संपाचा सातवा दिवस, मनसे 'तमाशा' करणार
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकार आज मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.
मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरुच आहे. कर्मचारी संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यातील बैठकीत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने मुंबईकर प्रवाशांचे हाल अजूनही सुरुच आहेत.
राज्य सरकार हायकोर्टात बाजू मांडणार
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकार आज मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून यामुळे सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे हा संप बेकायदेशीर असून न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे.
मनसेही संपात उतरणार!
बेस्टच्या संपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. "बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही तर सोमवारी (14 जानेवारी) मुंबईतील रस्त्यांवर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन आणि सत्ताधारीच जबाबदार असतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरु करणे
- 2016-17 आणि 2017-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस-कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
- अनुकंपा भरती तातडीने सुरु करावी
बेस्ट कशी तोट्यात?
- 'बेस्ट'वर सध्या अडीच हजार कोटींच कर्ज आहे.
- महिन्याला सुमारे 200 कोटींची तूट.
- बेस्टला दरवर्षी सुमारे 900 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.
- दरमहिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते.
- परिवहन विभागाचं एका दिवसाचं उत्पन्न 3 कोटी तर खर्च 6 कोटी आहे.
- वीजचोरी आणि वीजगळतीमुळे 200 कोटींचा तोटा होतो.
- बेस्टला पर्याय असणाऱ्या जलदगती वाहतूक सुविधांमुळे प्रवासी संख्या घटली
- ओला-उबेरमुळे बेस्टला मोठा फटका बसला.
- मेट्रोमुळेही ट्रॅफीकजाममुक्त प्रवास उपलब्ध झाला. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या घटली.
- मुंबईकर प्रवासी बेस्टऐवजी इतर वाहतूक सेवांकडे आकर्षित झाला.
संबंधित बातम्या
मुंबईतील रस्त्यांवर 'तमाशा' होणार, मनसेची 'बेस्ट' संपात उडी
संपाचा मुंबईकरांना फटका, बेस्ट भाडेवाढीचा प्रस्ताव
बेस्ट कर्मचारी संपावर चौथ्या दिवशीही तोडगा नाहीच
मुंबईकरांचे आणखी दोन दिवस हाल, बेस्टचा संप लांबण्याची शक्यता
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी
बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका
बेस्टचा संप : तिसऱ्या दिवशीही बस रस्त्यावर नाही, बत्तीही गुल होणार?
बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
बातम्या
बीड
Advertisement