एक्स्प्लोर
Advertisement
तब्बल 36 हजार बेस्ट कर्मचारी संपावर, मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईतील ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पगार वेळेवर मिळावा आणि तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्या आहेत.
मुंबई : मुंबईतील ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पगार वेळेवर मिळावा आणि तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्या आहेत.
LIVE : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त मेहता यांची अंतर्गत चर्चा, 3 वाजता संपावर तोड़गा निघण्याची शक्यता
LIVE : बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबतच्या बैठकीनंतरही बेस्ट कर्मचारी संपावर अटळ आहेत. आज मध्यरात्रीपासून 36 हजार बेस्ट कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती शशांक राव यांनी दिली.
महापौर बंगल्यावर महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि बेस्ट समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न टप्प्याटप्प्यानं सोडवू, असं आश्वासन महापौरांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं. मात्र जोपर्यंत आयुक्तांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याचं शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
- पगार वेळेवर मिळावा
- तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी
- 3 हजार 800 बस बंद
- 36 हजार बेस्ट कर्मचारी संपावर
- 500 मार्गांवर एकही बस नाही
- 30 लाख प्रवाशांचा खोळंबा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement