एक्स्प्लोर

तुंबापुरी ते सूर्यदर्शन, मुंबईत दिवसभरात काय-काय घडलं?

पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईत दुपारनंतर कडकडकीत उन पडलं. काल दिवसभराच्या दमदार पावसानंतर, रात्रभर पावसाने उसंत घेतली, मात्र आज सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली होती.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला तुफान पावसाने झोडपून काढलं आणि कधीही न थांबणारी मुंबई थांबली. रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं. परिणामी वाहतूक विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. या सर्व अभूतपूर्व परिस्थितीनंतर थांबलेली मुंबई पुन्हा एकदा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईत दुपारनंतर कडकडकीत उन पडलं. काल दिवसभराच्या दमदार पावसानंतर, रात्रभर पावसाने उसंत घेतली, मात्र आज सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली होती. पण दुपारनंतर पाऊस कमी कमी होत आला आणि त्यानंतर चक्क उन पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. असं असलं तरी मध्य आणि हार्बर रेल्वेने टाकलेली मान कायम होती. दुपारनंतर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर रेल्वे ट्रॅकववर पाणी भरल्याने 29 ऑगस्टला दिवसभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. आज सकाळी देखील हीच परिस्थिती असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिल्यानंतर मुंबईकरांनी घराबाहेर पडणं टाळलं. अखेर पाणी कमी झाल्यानंतर युद्ध पातळीवर प्रयत्न करुन वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावत असल्या तरी त्या उशीराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरही अशीच परिस्थिती आहे. मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सीएसएमटी-कल्याण विशेष ट्रेन सकाळी  7.26 मिनिटांनी रवाना करण्यात आली. तर सीएसएमटीहून कल्याणला जाणारी दुसरी विशेष ट्रेन 7.44 मिनिटांनी रवाना झाली.  हार्बर रेल्वेवरील वाहतूकही सकाळच्या वेळेला सुरु करण्यात आली. सीएसएमटीवरुन पनवेलसाठी पहिली विशेष लोकल 9.03 वाजता रवाना झाली. मात्र पनवेलहून सीएसएमटीला जाणारी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत रवाना होणार नाही, अशी अनाऊन्समेंट टिळकनगर स्टेशनवर सकाळी अकराच्या आसपास करण्यात आली.  दरम्यान दिवसभर पनवेल ते वाशी आणि त्यानंतर काही वेळाने पनवेल ते कुर्ला अशी वाहतूक सुरु होती. मध्य रेल्वे पावसामुळे मध्य रेल्वेवर खोळंबलेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीवरुन सकाळी 7.26 ला कल्याणकडे जाण्यासाठी पहिली लोकल सुटली. त्यानंतर मागोमाग दुसरी लोकलही निघाली, मात्र पुढे सायनजवळ ट्रॅकवर पाणी असल्याने, वाहतूक रखडली. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक काही वेळातच रखडली होती. मात्र दुपारी 1.20 ला मध्य रेल्वेची अप आणि डाऊन फास्ट वाहतूक सुरु झाली. तसंच डाऊन स्लो वाहतूकही सुरु झाली. हार्बर रेल्वे हार्बर मार्गावर सकाळी 9.03 वाजता सीएसएमटीवरुन पनवेलच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. मात्र ही वाहतूकही जास्तवेळ सुरु राहिली नाही. काही क्षणांतच वाहतूक रखडून ती ठप्प झाली. मात्र दुपारनंतर हार्बर मार्गावर कुर्ला ते पनवेल दरम्यान लोकल धावली. आता हार्बर मार्गावरची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र लोकल उशीराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे नेटाने सुरु मध्य आणि हार्बर रेल्वेने नांगी टाकली असली, तरी पश्चिम रेल्वे मात्र नेटाने सुरु आहे. सकाळच्या सत्रात लोकल धीम्या गतीने धावत होत्या. एल्फिन्स्टन स्थानकाजवळील पाण्याचा निचरा न झाल्याने त्यादरम्यान लोकल धीम्या गतीने धावल्या. रस्ते वाहतूक सुरळीत मुंबईत अगोदरच वाहतूक कोंडी असल्यामुळे बाहेरुन मुंबईत येणारी वाहनं थांबवण्यात आली होती. कधीही न थांबणारा एक्स्प्रेस वे देखील मुंबईत येण्यासाठी बंद करण्यात आला होता. तर इकडे नाशिकहून मुंबईला येण्यासाठीचा मार्गही वाहतुकीसाठी बंद होता. अखेर मुंबईच्या दिशेने येणारी पुणे आणि गोवा महामार्गाची वाहतूक रात्री 12 नंतर सुरु करण्यात आली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सकाळच्या वेळेला सुरळीत सुरु होती. रेल्वे वाहतूक बंद असल्याने बेस्टची सीएसएमटी-ठाणे विशेष बससेवा सुरु करण्यात आली.  ईस्टर्न फ्रीवेवरुन वाहतूक सुरळीत सुरु होती. अडकलेल्या लोकांसाठी बेस्टच्या ज्यादा बस सुरु करण्यात आल्या.  सीएसएमटीहून ठाणे, नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या बस खचाखच भरुन रवाना झाल्या. कारण रात्रभर ऑफिसमध्ये हजारो मुंबईकर अडकून होते. पाण्यात वाहनं बंद पडल्याने, इंधन संपल्याने किंवा वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी आपली वाहनं रस्त्यावरच सोडली होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबई पोलिसांनी सकाळच्या वेळेला आणि रात्रभर टोईंगच्या मदतीने ही वाहनं हटवून वाहतूक सुरळीत केली. दिवसभर मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवर रस्ते वाहतूक सुरळीत सुरु होती. मुंबईतल्या पावसाची आकडेवारी मुंबईतील काल सकाळी 8 ते आज सकाळी 6 वाजेपर्यंतची पावसाची आकडेवारी : शहर - 196 मिमी, पूर्व उपनगर - 220 मिमी, पश्चिम उपनगर - 219 मिमी डबेवाल्यांची सेवा बंद डब्बेवाल्यांची सेवा आज बंद होती. डब्बेवाले रात्रभर विविध स्टेशनवर अडकल्याने आज डब्बे पोहोचण्याची सेवा बंद करण्यात आली. मृत्यू, बेपत्ता या बातम्यांनी मुंबईकर हळहळले मुंबईतील तुफान पावसाने बरंच काही हिरावून घेतलं. या पावसात तडाख्यात कालपासून बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता आहे. तर एका वकिलाचा कार पाण्यात अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर विविध ठिकाणी घरं पडूनही अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये 13 जणांचा मृत्यू मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये कालच्या पावसामुळं 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विक्रोळीमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. तर ठाण्यामध्ये कालपासून 4 जण वाहून गेलेत. याशिवाय कालच्या पावसात नेमके किती बेपत्ता झाले आहेत, याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. दुसरीकडे पालघरमध्ये देखील पावसाने कहर केला असून, आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. डहाणू आणि बोईसर परिसरात मुसळधार पावसात 4 जण वाहून गेले. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू आहे. तर आज सकाळी विनोद दळवी नावाचा तरूण जव्हार परिसरातल्या नाल्यातून वाहून गेला. नरू वळवी नावाचा मुलगा बोटीनं सातपाटी येथे जात असताना बुडाला आहे. स्पिरीट ऑफ मुंबई, मदतीसाठी अनेक हात सरसावले नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपूर्ण मुंबई एकवटली. पावसात अडकलेल्यांना मदत देण्यासाठी ठिकठिकाणी खाण्यापिण्याची, निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर भर पावसात काही तरुण रात्रभर वाहतूक कोंडी सोडवत होते. वाहतूक कोंडी अडकलेल्यांना खाण्यासाठी अन्न आणि पाणी जागेवर नेऊन देत होते. काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग होता : उद्धव ठाकरे 24 तासानंतर पावसानं मुंबईतून एक्झिट घेतल्यानं तुम्ही-आम्ही सुटकेचा श्वास सोडला, पण काल मुंबईवर एक भयानक संकट घोंघावत होतं. ज्याची आपल्याला कल्पनाही केलेली नव्हती. काल (मंगळवार) दुपारच्या सुमारास मुंबईच्या डोक्यावर तब्बल 9 किलोमीटर उंचीचा ढग होता. जो फुटला असता तर मुंबईची परिस्थिती आणखी बिकट झाली असती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी आज (बुधवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही धक्कादाय माहिती उघड केली. दुपारनंतर सूर्यदर्शन मुसळधार पावसानंतर मुंबईकरांना आज सूर्यदर्शन झालं आहे. काल दिवसभर धो धो बरसल्यानंतर पावसाने मुंबईत आज जराशी उसंत घेतली. रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे मुंबईकरांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेक जण काल दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर वाहतूक कोंडीत अडकून होते. अनेकांनी वाहनं जागीच सोडून पर्यायी वाहतूक व्यवस्थेने घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर पाण्यात वाहनं बंद पडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. संबंधित बातम्या :

काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग होता : उद्धव ठाकरे

मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये 13 जणांचा मृत्यू

पाण्यातून चालताना डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये कोसळले?

मुंबईकरांना अखेर सूर्यदर्शन, पावसाची उसंत!

मुंबईचा पाऊस : सायनमध्ये गाडीत गुदमरुन वकिलाचा मृत्यू

पाणी उकळून प्या, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

मुंबईत पावसाची उघडझाप सुरुच, लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही!

मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget