एक्स्प्लोर

Prasad Lad : प्रसाद लाडांनी नियमांचं उल्लंघन केलं, आपचा आरोप तर लाड म्हणाले, मी माझ्या कंपनीचा नोकरदार!

Prasad Lad : मुंबई बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Prasad Lad Mumbai Bank : मुंबई बँक संचालक मंडळातील सदस्यांच्या पात्रतेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करत बँकेचे संचालक झाल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. तर, मी माझ्या कंपनीचा नोकरदार असल्याचे सांगत लाड यांनी स्वत:चा बचाव केला आहे. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आम  आदमी पक्षातचे धनंजय शिंदे यांनी मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर आरोप केले आहेत. बँकेतील संचालक मंडळ ही प्रवीण दरेकर यांची टोळी असून यामध्ये सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचारी म्हणून प्रसाद लाड निवडून येत आहेत. मात्र ते कर्मचारी नाहीत. सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन आहे. 

नाबार्डकडून बँकेच्या अनियमितेवर बोट ठेवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी म्हटले. लाड यांच्या कंपनीला कमी टक्क्यात व्याज देण्यात आलं जेव्हा ते संचालक मंडळावर होते. हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रकरण दाबलं असल्याचाही आरोप शिंदे यांनी केला. 

महाविकास आघाडीकडून असहकार

या प्रकरणात महाविकास आघाडीतील सहकारमंत्री आम्हाला असहकार करत असल्याता आरोप शिंदे यांनी केला. महाविकास आघाडीतील नेते प्रवीण दरेकरांना मदत करत आहेत. दरेकरांवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही  सतत करतोय मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे हात दगडाखाली असल्याचे त्यांनी म्हटले. 

जोरदार प्रत्युत्तर मिळणार; लाड यांचे आव्हान

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 'आप'चे आरोप फेटाळून लावले आहेत. मी माझ्या कंपनीचा नोकरदार आहे. मुकेश अंबानी उद्योगपती असले तरीही ते त्यांच्या कंपनीत ते नोकर आहेत अशी भूमिका प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. 'आप'चे शिंदे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप लाड यांनी केला. 

या प्रकरणात मला नोटीस येईल अशी अपेक्षा आहे. मला नोटीस येऊ द्या, त्याचं मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचेही लाड यांनी सांगितले. माझ्या विरोधात असणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे आव्हान लाड यांनी दिले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget