एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत आणखी एका वृद्धाचा बँकेबाहेरील रांगेतच मृत्यूू
मिरा-भाईंदर : नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरील रांगेत आणखी एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील भाईंदमध्ये ही घटना घडली आहे. दीपकभाई शाह असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 60 वर्षांचे होते.
पैसे बदलण्यासाठी बँकेत आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू
भाईंदरमधील बेसीन कॅथनिक बँकेबाहेर आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर, पैसे बदलण्यासाठी लोक बँकांमध्ये गर्दी करत आहेत. दीपकभाई शाह आज सकाळी 7 वाजल्यापासून रांगेत उभे होते. मात्र सकाळी 11 वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते तिथेच कोसळले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाचा बँकेबाहेरच्या रांगेतच मृत्यू
दुसरीकडे नांदेडमध्येही 70 वर्षीय दिगंबर मारीबा कसबे यांचा रांगेतच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने दिगंबर कसबे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याआधी मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वीच बँकेत पैसे बदलण्यासाठी आलेल्या 73 वर्षीय विश्वनाथ वर्तक या वृद्धाचा रांगेतच मृत्यू झाला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement