एक्स्प्लोर
Advertisement
मुलुंडमधील ब्रेन डेड महिलेने सहा जणांना जीवदान दिलं!
मुंबई : मुंबईच्या मुलुंड भागात राहणाऱ्या स्नेहा येवलेकर यांना अचानक ब्रेन हॅमरेज झालं आणि त्यांच्या येवलेकर कुटुंबाला एक मोठा धक्काच बसला. मात्र, त्यांनी यात खचून न जाता त्यांनी एक समाजासमोर अवयवदानाचा आदर्श ठेवून जवळपास सहा जणांना एक नवीन आयुष्य दिलं.
स्नेहा येवलेकर, वय वर्ष 54. या नाबार्डमध्ये कार्यरत होत्या. मात्र सोमवारी अचानक अशक्तपणामुळे चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. हा प्रकार अचानक घडल्यामुळे ऑफिसमधले लोक भांबावले आणि त्यांनी स्नेहा येवलेकरांच्या कुटुंबीयांना फोन करून दवाखान्यात बोलावलं. अनेक टेस्ट केल्या आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं सांगितलं. खरंतर हे ऐकल्यानंतर काय करावं? हा प्रश्न येवलेकर कुटुंबीयांसमोर होता. मात्र, त्यावेळी त्यांच्या शेजारी राहत असलेल डॉ. संजय ओक यांनी एक मार्ग सांगितला.
स्नेहा येवलेकरांचं अवयव दान करुन इतरांना जीवनदान द्यावं, असं डॉ. ओक यांनी येवलेकर कुटुंबीयांना सुचवलं. जेणेकरुन स्नेहा येवलेकर आपल्यात राहतील आणि याचा खरा उपयोग गरजू रुग्णाला होईल. त्यानुसार, अशा अवघड मानसिक परिस्थितीतही येवलेकर कुटुंबीयानी डॉ. ओक यांनी दिलेला सल्ला प्रत्यक्षात आणायचा ठरवला. स्नेहा येवलेकरांचे सहा अवयव, यात 2 डोळे, 2 किडनी, हृदय, यकृत हे त्यांनी फोर्टिस रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी दिलं. यामध्ये पोलिसांनीही ग्रीन कॉरिडोअर तयार करुन देऊन कर्तव्यदक्षता दाखवली.
खरंतर अशा परिस्थितीत हा धाडसी निर्णय घेणं कोणत्याही कुटुंबासाठी अवघड असतं. पण हे सुंदर आयुष्य लोकांना मिळण्यासाठी येवलेकर कुटुंबीयांनी घेतलेला धाडसी निर्णय समाजासाठी आदर्श आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement