एक्स्प्लोर

जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवड अन् चार प्रभाग पद्धत रद्द होणार?

फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात घेतलेले दोन महत्वपूर्ण निर्णय रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवड आणि चार प्रभाग पद्धतीचा समावेश आहे.

मुंबई : भाजपनं सुरु केलेली नवीन प्रभाग पद्धत आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निडण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी 2016 साली नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नवीन पद्धत सुरु केली होती. याअगोदरही काँग्रेस सरकारच्या काळात असाच निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याला विरोध झाल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. फेब्रुवारी 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेतले. पहिला चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग पद्धत. पूर्वी नगरसेवक एकाच प्रभागातून निवडून येत होता. मात्र, नवीन पद्धतीनुसार चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग झाल्याने त्याला आपल्य प्रभागाव्यतिरिक्त अन्य तीन प्रभागामध्येही निवडून यावे लागत होते. तर, दुसरा निर्णय म्हणजे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडण्याची पद्धत. हे दोन्ही निर्णय रद्द करण्यासाठी महाविकासआघाडीच्या सरकारकडून हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुंबई मनपा वगळता अन्य पालिकेत 4 प्रभाग पद्धत रद्द करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. भाजपचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी निर्णय? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही पद्धत रद्द करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकसदस्यीय पद्धतीमुळे केवळ एकाच प्रभागात प्रभाव असलेल्या उमेदवाराची अन्य प्रभागातून पिछेहाट होत होती. भाजपची प्रभावी प्रचारयंत्राणा याचा फायदा उचलत यश संपादित करत होती. त्यामुळेच महाविकास आघाडीतील पक्षांचा या पद्धतीला विरोध आहे. थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडीमुळे जास्त सदस्य असलेल्या पक्षालाही सरपंच विरोधीपक्षाचा निवडून आला तर त्यावरच अवलंबूर राहावे लागत आहे. यात गावातील सर्वच समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचांकडे असल्याने, निर्णय घेण्याच्या बाबतीत सरपंचांची एकाधिकारशाही वाढल्याचे दिसते आहे. शिवाय बहुमत नसलेल्या सरपंचांना अनुकूल निर्णयासाठी तारेवरची कसरतही करावी लागत आहे. वाचा - अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार आक्रमक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन जोरदार आंदोलन महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; रामदास आठवलेंचा दावा Uddhav Thackeray | मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही, आमचं मंत्रिमंडळ जनतेशी बांधिल : मुख्यमंत्री
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Churchgate Station Fire : चर्चगेट स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणAkola DPDC Meeting Rada : अकोल्यात Thackeray BJP भिडले, नेमकं काय घडलं?MNS Shiv Sena UBT Nashik : मोठी बातमी ! दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनAjit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा
शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
Embed widget