एक्स्प्लोर
एमपी मिल कम्पाऊंड घोटाळा : प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नसल्याचा लोकायुक्तांचा ठपका : सूत्र
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड इथल्या एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे.
मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत लोकयुक्तांनी एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच लोकायुक्तांचा हा अहवाल आणि त्यावर राज्य सरकारने केलेली कारवाई हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू होण्याआधीच त्याला स्थगिती दिली. मात्र या निर्णय प्रक्रियेत आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन विकासकाच्या फायद्यासाठी मंत्रीमहोदयांनी निर्णय घेतल्याचं मतही लोकयुक्तांनी व्यक्त केलं आहे. "मुख्यंत्र्यांना याबाबतची कल्पना नव्हती, फाईलवर चुकून तसा शेरा मारण्यात आला," अशी कबुली प्रकाश मेहता यांनी लोकायुक्तांकडे दिली आहे.
ताडदेवमधील एमपी मिल कंपाऊंडसह मुंबईतील अन्य एसआरए प्रकल्पांना प्रकाश मेहता यांनी दिलेली मंजुरी वादग्रस्त ठरली आहे. यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड इथल्या एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. एसडी कॉर्पोरेशन या विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी राज्यपालांनी लोकायुक्त चौकशीची परवानगी दिल्यानंतर म्हाडा, एसआरए आणि गृहनिर्माण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांपुढे हजेरी लावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement