एक्स्प्लोर
Advertisement
कुर्ला स्टेशनवर ट्रेनमधून पडलेल्या मायलेकींचे प्राण जवानांनी वाचवले
मुंबई : मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनवर लोकलमधून पडलेल्या दोन महिला प्रवाशांचे प्राण जवानांनी वाचवले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर सातवर ट्रेनमध्ये चढणाऱ्या दोघींना कुर्ला आरपीएफच्या दोन जवानांनी वाचवलं.
कुर्ल्याहून मानखुर्दकडे जाण्यासाठी एक महिला आणि तिची मुलगी ट्रेनमध्ये चढत होत्या. त्याचवेळी गाडी सुरु झाली आणि त्यात ती मुलगी गाडी खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली. इतक्यात आरपीएफच्या प्रमोद गीते यांनी प्रसंगावधान दाखवून त्या मुलीला ट्रेनखाली जाण्यापासून बाहेर ओढलं, तर तिच्या आईचे प्राणही कर्तव्यावर असलेले विकास पाटील यांनी वाचवले.
विकास पाटील आणि प्रमोद गीते हे दोघंही बंदोबस्तासाठी असताना ही घटना घडली. थोडीशी घाई आणि चूक या मायलेकींच्या जीवावर बेतू शकली असती, मात्र क्षणाचाही विलंब न लावता जवानांनी दोघींचे प्राण वाचवले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
Advertisement