एक्स्प्लोर
ठाण्यात इमारतीच्या गच्चीवर माकड फास लागलेल्या अवस्थेत
या माकडला फास देऊन मारण्यात आल्याचा आरोप इमारतीमधीलल एका रहिवाशाने केला आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर माकडाच्या मृत्यूबाबत सत्यता समोर येईल असं वनविभागानं म्हटलं आहे.
ठाणे : ठाण्याच्या लोकमान्य नगरमधील एका इमारतीच्या गच्चीवर माकड मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. सिद्धिविनायक पार्कमधील इमारत क्रमांक ३च्या गच्चीवर हे माकड दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळलं.
या माकडला फास देऊन मारण्यात आल्याचा आरोप इमारतीमधीलल एका रहिवाशाने केला आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर माकडाच्या मृत्यूबाबत सत्यता समोर येईल असं वनविभागानं म्हटलं आहे. लोकमान्यनगर परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. माकडलीलांमुळे येथील नागरिक त्रस्त असतात. याच कारणातून या माकडाला मारलं असावं असं बोललं जातं आहे.
या माकडाला फास देऊन मारण्यात आले की त्याचा त्याठिकाणी खेळता-खेळता नैसर्गिक मृत्यू झाला. याबाबत वनविभाग सध्या तपास करत आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतरच माकडाच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. असं वनविभागानं स्पष्ट केलं.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement