(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल', मोहित कंबोज यांचा इशारा, थेट मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं!
Mohit Kamboj Tweet : मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे सगळे रेकॅार्ड तोडत आहे. या एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.
Mohit Kamboj : मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे (Corruption) सगळे रेकॅार्ड तोडत आहे. पालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस द्या. त्याला कंट्रोल करण्याची हिच योग्य वेळ आहे. एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, असा इशारा भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे.
मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर मुंबई महापालिकेतील (BMC) अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कंबोज यांच्या ट्विटनं पालिकेतील तो अधिकारी नेमकं कोण? याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Dear CM @mieknathshinde ji ,
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 14, 2024
Wanted to get ur notice that one of AMC in BMC will break all records of corruption and it’s just starting better to control now or this government will be in problem coz of this particular officer !
His extortion is at next level and mouth is gutter!
नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये ?
मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे सगळे रेकॅार्ड तोडत आहे. पालिकेतील ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस द्या. या एका अधिकाऱ्यामुळे तुमचे सरकार अडचणीत येईल. या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला गेला असून याचे तोंड म्हणजे गटार आहे. त्याला कंट्रोल करण्याची हिच योग्य वेळ आहे, असे आवाहन मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
Today I am sending a complain to DG ( Anti corruption ) about modus of working of this particular Corrupt AMC of BMC with all details and recordings !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 14, 2024
Name will be revealed in the letter , stay tuned !
Cc to :- @CVCIndia
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार तक्रार
मोहित कंबोज यांनी पुढे म्हटले आहे की, या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार तक्रार आहे. या अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे सध्या मोठी खळबळ उडाली असून तो अधिकारी नेमका कोण याची जोरदार चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा
राष्ट्रवादीमुळे लोकसभेत महायुतीला फटका, उत्तर प्रदेशचा दाखला देत छगन भुजबळांनी गणित मांडलं!