Mumbai : लकडावालाचे शरद पवार, राजीव गांधींसोबत फोटो ट्विट करत मोहित कम्बोज म्हणाले...
Lakdawala Controversy : भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी दाऊद गँगचा फायनान्सर लकडावाला यांच्यासोबतचे राजीव गांधी आणि शरद पवार यांचे फोटो ट्वविट केले आहेत.
Mohit Kamboj Bhartiya : राजकीय वाद आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांचा डी गँगशी संबंध असल्याचं दावा करत गंभीर आरोप केले आहेत. तर आता दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bharatiya) यांनी दाऊद गँगचा फायनान्सर लकडावाला यांच्यासोबतचे राजीव गांधी आणि शरद पवार यांचे फोटो ट्वविट केले आहेत. कंबोज यांनी काही फोटो ट्विट करत राऊतांनी प्रश्न विचारले आहेत.
कंबोज यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये डी गँगचा फायनान्सर लकडावालाचे राजीव गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. तसेच कंबोज यांनी हे फोटो ट्विट करत राजीव गांधी आणि शरद पवार यांचे लकडावाला आणि दाऊदसोबत काय संबंध आहेत, अशी विचारणाही केली आहे.
Dawood Ibrahim के सभी गुर्गे एक साथ ?@rautsanjay61 pic.twitter.com/NWXhsmijGz
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 27, 2022
लवंडे राउट का क्या बोलना है इसपे ?
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 27, 2022
Dawood Ibrahim के गुर्गे का क्या सम्बन्ध है पवार साहब के साथ ? @rautsanjay61 pic.twitter.com/tfUBSFHSdn
डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्यानं कुठं केला? संजय राऊतांचा सवाल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील वातावरण बिघडवण्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्यानं कुठं केला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. राऊत यांनी म्हटलं आहे की, 'राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले. मुंबईत धिंगाणा घालू लागले. वातावरण बिघडवू लागले. मात्र त्यांचे डी गँगशी संबंध असल्याचं समोर येतंय. गेल्या 15 दिवसांत जे घडतंय त्यामागे डी गँगचा पैसा लागला आहे', असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- सोंगाड्या चित्रपट निघाला असता संजय राऊत यांनाच भूमिका मिळाली असती, गिरीश महाजनांची थेट टीका
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात अवमान याचिका; हायकोर्ट म्हणाले, 'आमचे खांदे भक्कम'
- Kirit Somaiya : सोमय्यांसह भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, पोलिसांवर खोटी FIR दाखल केल्याचा आरोप
- 66 व्या वर्षी भारतीय माजी क्रिकेटपटू करणार दुसरं लग्न, नवरी 28 वर्षांनी लहान, हळदीचे फोटो व्हायरल