(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya : सोमय्यांसह भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, पोलिसांवर खोटी FIR दाखल केल्याचा आरोप
Mumbai News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. यासंदर्भात सोमय्या भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेणार आहेत.
Mumbai News : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या नावाने खोटी एफआयआर दाखल केल्याचे गंभीर आरोप पोलिसांवर लावले आहेत. पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर (FIR) खोटी असून आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा दावा सोमय्यांकडून करण्यात येतं आहे. या संदर्भात आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मुंबई पोलीस आयुक्तांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. यासंदर्भात ते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.
किरीट सोमय्या बनावट एफआयआरबाबत तक्रार करण्यासाठी मंगळवारी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी ते सुमारे दीड तास खार पोलीस स्थानकात होते. त्यानंतर त्यांनी बाहेर येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या संदर्भात आज ते राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एफआयआरवर माझी स्वाक्षरी नाही. त्यामुळे ती एफआयआर खोटी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दाखल करण्यात आलेली एफआयआर चुकीची असून त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी विचारला आहे. आपल्या नावाने बोगस एफआयआर दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर 23 एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या.
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला. हा एफआयआर बोगस असून त्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kirit Somaiya : पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का? खोट्या सहीनिशी एफआयआर दाखल केल्याचा सोमय्यांचा गंभीर आरोप
- सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात; संजय राऊतांचा टोला
- राणा दाम्पत्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला; सत्र न्यायालयाचे राज्य सरकारला जामिनाबाबत 'हे' निर्देश
- औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार?