Attack On Nationalist Youth Congress: राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांचा तलवारीने हल्ला; तिघांपैकी दोघे गंभीर जखमी, मुंबईतील ताडदेवमधील घटना
Attack On Nationalist Youth Congress: मुंबईतील ताडदेव परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Mumbai, Attack On Nationalist Youth Congress: मुंबईच्या (Mumbai News) ताडदेव (Tardeo News) भागात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress Workers) तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीनं हल्ला केला. यामध्ये तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ताडदेव पोलिसांनी (Tardeo Police) आतापर्यंत याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. हा हल्ला का करण्यात आला? यामागील सूत्रधार कोण? याचा शोध सुरू आहे.
मुंबईच्या (Mumbai Crime News) ताडदेव (Tardeo Crime News) भागात सोमवारी (3 एप्रिल 2023) रात्री एक धक्कादायक घटना घडली. ताडदेवच्या (Tardeo) जनता नगरमधील (Janta Nagar) एका बिल्डिंगमध्ये 30 ते 40 अज्ञात लोकांनी तलवारी आणि चॉपर्स घेऊन प्रवेश केला. त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांपैकी दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.
पाहा व्हिडीओ : Tardeo NCP leader Attack : राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यावर 30 ते 40 जणांचा तलवारीने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ताडदेव परिसरातील जनता नगर भागात असणाऱ्या इमारतीच्या आवारात 30 ते 40 अज्ञात लोक अचानक आले. त्यानंतर त्या इमारतीत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जणांवर त्यांनी हल्ला केला. हल्ला करण्यामागील कारण अद्याप कळालेलं नाही. पण तिघांपैकी दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झालेले आहेत. हल्लेखोरांकडे तलवारी, चॉपर आणि बांबू होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जणांवर हल्ला केला. त्यामुळे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी तिघांना अटक केली आहे. तर अन्य लोकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पण हल्लेखोर नेमके कोण होते? कुठून आले होते? त्यांचा हेतू काय होता? यासंदर्भात मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Dombivli Crime : डोंबिवलीत वृध्द दाम्पत्याच्या घरी गुंडांचा धुडगूस, हातात कोयता घेऊन दमदाटी