एक्स्प्लोर
Advertisement
मनसेचं इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावणार
मुंबई : एकहाती सत्तेचं स्वप्न भंगल्याने भरकटलेल्या मनसेच्या इंजिनची दिशा पुन्हा बदलण्यात येणार आहे. डावीकडून उजवीकडे धावणारं इंजिन आता पुन्हा उजवीकडून डाव्या दिशेने धावणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे जोरदार तोंडावर आपटल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
2012 पर्यंत जोरदार वेगाने धावणाऱ्या इंजिनची दिशा डावीकडे होती. मात्र, 2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळालं. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या पक्षाचं चिन्हं मराठी भाषा ज्या प्रमाणे लिहितात त्याप्रमाणेच म्हणजे उजवीकडे धावणारं हवं यावर एकमत झालं आणि इंजिनची दिशा बदलली. मात्र, सध्या मनसेचं इंजिन थेट यार्डात पोहचल्यानं आगामी पालिका निवडणुकांसाठी नवा बदल करण्याचा सल्ला वास्तूतज्ञांनी दिला आहे.
त्यामुळे 8 नोव्हेंबरला पुण्यात होणाऱ्या मेळाव्याच्या जाहिरातीवर डावीकडे धावणारं इंजिन छापण्यात आले आहे. तसेच लेटरहेडवरही 'श्री जयमहाराष्ट्र' आणि राजमुद्राही छापण्यात येणार आहे. त्यामुळे हे नवे बदल प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू राज ठाकरेंना कितपत फलदायी ठरतात हे पाहावं लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement