KDMC मध्ये शिवसेनेचा मनसेला पुन्हा दे धक्का, दोन माजी नगरसेवकांसह मनसे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार
शिवसेनेने मनसेला पुन्हा धक्का दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे.
कल्याण : कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेला पुन्हा धक्का दिला आहे. कल्याण ग्रामीण भागातील मनसेच्या दोन नगरसेवकांसह मनसे तालुका प्रमुख ,मनसे पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
प्रकाश माने आणि पूजा पाटील असं या दोन माजी नगरसेवकांची नावं आहेत. प्रकाश माने हे मनसेचे जिल्हा सचिव आहेत. त्यांच्यासह मनसेचे तालुका प्रमुख गजानन पाटील मनसेचे विभाग प्रमुख, शाखा अध्यक्ष हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे, त्यांची नावं खालीलप्रमाणे आहेत.
• माजी नगरसेवक आणि नगरसेविका
1. पूजा गजानन पाटील, माजी नगरसेविका, घारीवली, काटई, उसरघर
2. प्रकाश माने, माजी नगरसेवक तथा जिल्हा सचिव, मनसे
• पदाधिकारी
1. गजानन पाटील, मनसे तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य
2. सुभाष तुकाराम पाटील, विभाग अध्यक्ष, मनसे
3. पांडे अण्णा, उप विभाग सचिव, मनसे
4. निशांत पाटील, शाखा अध्यक्ष, मनसे
5. भास्कर गांगुर्डे, शाखा अध्यक्ष, मनसे
6. विठ्ठल शिंदे, शाखा अध्यक्ष, मनसे
• विद्यार्थी सेना, मनसे
1. प्रवीण परदेशी, अध्यक्ष, विद्यार्थी सेना विभाग, मनसे
2. संदीप मोरे, शाखा अध्यक्ष, विद्यार्थी सेना विभाग, मनसे