एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसेची ईडीला नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
काल सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यात पोहोचलेले राज ठाकरे रात्री सव्वाआठच्या सुमारास बाहेर आले. चौकशीनंतर राज ठाकरे कृष्णकुंजवर पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी (सक्तवसुली संचालनालय) ने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर काल त्यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली. यानंतर आता मनसेने ईडीला नोटीस पाठवली आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेरील फलक मराठी भाषेत नसल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली असल्याचे मनसेने म्हटले आहे. महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरलं आहे पण आम्ही ह्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ह्या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर काल त्यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली. यानंतर "या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं थोबाड थांबणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन," अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला होता. गुरुवारी (22 ऑगस्ट) अंमलबजावणी संचालनालयाकडून राज ठाकरे यांची तब्बल साडेआठ ते नऊ तास चौकशी झाली. काल सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यात पोहोचलेले राज ठाकरे रात्री सव्वाआठच्या सुमारास बाहेर आले. चौकशीनंतर राज ठाकरे कृष्णकुंजवर पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी राज यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु राज यांनी बोलणं टाळलं. कुटुंबीयांसमवेत ते थेट कृष्णकुंजकडे रवाना झाले. इथे मनसेचे नेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. कृष्णकुंजबाहेरही माध्यमांनी राज यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही बोलले नाहीत. परंतु चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना राज यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. राज म्हणाले की, "या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं थोबाड थांबणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन." कथित कोहिनूर स्क्वेअर घोटाळ्याप्रकरणी राज ठाकरेंवर कोणत्या प्रश्नांची सरबत्ती केली, त्या प्रश्नांना राज ठाकरेंनी काय उत्तरं दिली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान राज ठाकरेंची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असताना त्यांचे कुटुंबिय आणि मनसे कार्यकर्ते दिवसभर ईडी कार्यालयाबाहेर उभे होते. काय आहे प्रकरण? काही वर्षांपूर्वी एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेषमनसेची ईडीला नोटीस! महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरलं आहे पण आम्ही ह्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे,आणि ह्या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार? @CMOMaharashtra pic.twitter.com/LcpvnaGhD2
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 23, 2019
संबंधित बातम्या
- ईडी नोटीस प्रकरण, ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची राज ठाकरेंच्या समर्थनार्थ आत्महत्या?
- Raj Thackeray | राज ठाकरेंना ईडीनं नोटीस बजावली, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
- ED Notice | ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, राज ठाकरेंंचं कार्यकर्त्यांना आवाहन
- राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवल्याचं विशेष वाटत नाही : संजय राऊत
- कर नाही त्याला डर कशाला? राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसनंतर मनसे आक्रम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement