एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मनसेकडून आदित्य ठाकरे यांची बाजू

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मनसेने आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली आहे. ठाकरे परिवारातील सदस्याकडून असं काही झालं असेल, असं वाटतं नसल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात एकीकडे विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत असतानाचं दुसरीकडे मनसेने मात्र आदित्य यांची बाजू घेतली आहे. ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशी काही गोष्ट झाली असेल असं मला वाटतं नाही. अशी प्रतिक्रिया मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. बाळा नांदगावकर आज बेस्ट बील दरवाढी विरोधात शिष्टमंडळासह बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची भेट घेण्यासाठी कुलाबा येथील बेस्ट भवन येथे आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी बाळा नांदगावकर आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात तब्बल 2 तास चर्चा झाली. याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की बेस्ट प्रशासनाने नागरिकांना भरमसाठ वीज बिलं पाठवून जो शॉक दिलाय. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या अनोख्या पद्दतीने बेस्ट प्रशासनाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे बेस्ट प्रशासन जबाबदार असेल. दरम्यान वाशी आणि शिरूर येथे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जी वितरण विभागाच्या कार्यालयांची तोडफोड केली होती. त्या खळखट्याक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा ऑफीस समोर पोलीस प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस प्रशासनकडून बेस्ट भवनच्या बाहेर दोन पोलीस व्हॅन, जलद कृती दलाची गाडी आणून उभी केली होती. यासोबतच बेस्ट भवनच्या प्रत्येक गेटवर पोलिसांची फौज उभी केली होती. यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माझ्या चितेला अग्नी देणारा हिरावून घेतला; सुशांतच्या वडिलांचं सुप्रीम कोर्टात उत्तर

यावेळी बाळा नांदगावकर यांना मागील काही दिवसांपासून मुंबईतील बेस्ट प्रशासनाचे 89 पैकी केवळ 11 वीज बील भरणा केंद्र सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होतं असल्या बाबतचा प्रश्न विचारला असता बाळा नांदगावकर म्हणाले की याबाबत बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच इतर वीज भरणा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन बागडे यांनी दिलं असल्याचं नांदगावकर म्हणाले.

शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. त्यांच वक्तव्य अपरिपक्व आहे. या शरद पवार यांच्या वक्तव्यबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, त्यांचा तो कौटुंबिक प्रश्न आहे. त्यांचे ते सोडवतील. यासोबतच आदित्य ठाकरे यांचे सुशांतसिंह राजपूत प्रकरणात वारंवार नाव येत असल्याच्या प्रकरणात बोलताना नांदगावकर म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती असं काही करेल असं वाटतं नाही. यासोबतच सीबीआय चौकशी बाबत मागणी होतेय. ती व्हावी.

Sanjay Raut PC | शरद पवार यांचं कोणतंही वक्तव्य निरर्थक नसतं : संजय राऊत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : आम्ही बोलायचो ते भाजपला टोचायचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Majha Vision Full : शिंदे - दादांच्या बंडाची कहाणी! फडणवीसांनी सगळंच सांगितलं!Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 14 April 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Embed widget