एक्स्प्लोर
राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोदींवर निशाणा, नवं व्यंगचित्र प्रसिद्ध
गांधीजी 'भारताचा इतिहास' नामक पुस्तक घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या मागे वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरु बसले आहेत, तर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसले आहेत, असे राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात दिसते आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निशाणा केला आहे. फेसबुकवरील ऑफिशियल पेजवरुन राज ठाकरेंनी मोदींवर टीका करणारं व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.
7 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "इतिहासात काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काँग्रेस कमेटीची निवडणूक झाली होती त्यावेली 12 पैकी 9 सदस्यांनी सरदार पटेल यांची निवड केली होती. तर 3 जणांनी नोटाला पसंती दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता."
मोदींच्या या वक्तव्याला उत्तर म्हणून राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे आणि त्यातून मोदींवर निशाणा साधला आहे.
गांधीजी 'भारताचा इतिहास' नामक पुस्तक घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या मागे वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरु बसले आहेत, तर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसले आहेत, असे राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात दिसते आहे.
या व्यंगचित्रात गांधी मोदींना उद्देशून म्हणतात, "अरे बेटा नरेंद्र, तुला दोन गोष्टी सांगायच्या आहेत! जवाहरलालना पंतप्रधान मी केले! काँग्रेसने नाही! यावर काही बोलायचंय? आणि दुसरं म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री होते, तरी ते 'काँग्रेसचेच' होते ना? मग तुला त्यांचा पुतळा उभारावासा वाटला! पण तू जिथून आलास त्या हेडगेवारांचा किंवा गोळवळकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला? प्रचारक होतास ना तू?"
मोदींनी लोकसभेत केलेल्या भाषणावरुन आधीच काँग्रेससह विरोधकांनी तीव्र टीका केली होती. आता राज ठाकरेंनीही व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रावर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement