एक्स्प्लोर
पाडवा मेळाव्यात मनसेकडून आवाज मर्यादेचं उल्लंघन, हायकोर्टाची नोटीस

मुंबई: गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडल्यानं मनसेला हायकोर्टानं नोटीस पाठवली आहे. सभेदरम्यान शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्या! अशी सक्त ताकीद देत सशर्त सभेला परवानगी देण्यात आली होती.
मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं मनसेला हायकोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी बऱ्याचदा सेनेच्याही सभांमध्येही अनेकदा डेसिबल्सची मर्यादा ओलांडली गेली होती.
पाडवा मेळाव्याच्या वेळेस शिवाजी पार्कवर संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान 114 डेसिबल्स इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली. त्यामुळे माजी आमदार नितिन सरदेसाई यांना आयोजक म्हणून दोषी धरण्यात आलं आहे. आता मनसेवर नेमकी काय कारवाई होणार ते पाहावं लागेलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
