एक्स्प्लोर
शौचालयाच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू
मित्रांसोबत घराशेजारी खेळत असताना शौचालयाच्या टाकीत पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे.
मुंबई : मित्रांसोबत घराशेजारी खेळत असताना शौचालयाच्या टाकीत पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यातील वाफे गावात घडली आहे. अरमान खान असे या मुलाचे नाव असून शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अरमान खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. मित्रांसोबत खेळत असताना परिसरातील श्री समर्थ कृपा इमारतीच्या शौचालयाच्या उघड्या टाकीत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी अरमानचा मृतदेह टाकीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
अरमानच्या नातेवाईकांनी इमारतीच्या व्यवस्थापकाच्या निश्काळजीपणामुळे अरमानचा मृत्यू झाल्याचा आरोप करत यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे. तर याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाती गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement