एक्स्प्लोर
Advertisement
आमदार वारीस पठाण यांना अटक केल्याचा दावा, पोलिसांकडून मात्र अटक केली नसल्याची माहिती
पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा प्रार्थनेसाठी परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई : भायखळ्याचे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरुन दावा-प्रतिदावा सुरु आहे. आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वारिस पठाण यांचं म्हणणं आहे. 370 कलम हटवल्याने त्यांनी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसाठी त्यांनी नमाज पठण केल्याचं बोललं जातंय.
मुंबईत शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी काश्मीरी जनतेसाठी विशेष प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा प्रार्थनेसाठी परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तर वारीस पठाण यांना ताब्यात घेतलेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. इतर काही लोकांना ताब्यात घेतलं असून आमदार पठाण यांना फक्त त्या जागेवरून दूर होण्यास सांगितलं अशी माहितीही पोलिसांनी दिली.
काश्मीरसंबधातलं 370 कलम हटविल्यानंतर काश्मीरात तणावपूर्ण शांतता आहे. तर देशभरात त्याचं स्वागत करण्यात आलं आहे. तर अनेक लोकांकडून या निर्णयाचा विरोध देखील केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर
Advertisement