(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milk Price Hike : महागाईचा फटका! मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार, दुधाच्या दरात 2 ते 3 रुपयांची वाढ
Mumbai Milk Price Hike : मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार आहे. एक लीटर म्हशीचे सुटे दूध रिटेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी महागणार आहेत.
मुंबई : सर्वसामान्यांना बसणारी महागाईची (Inflation) झळ काही कमी होत नाही. मुंबईत (Mumbai) 1 सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार (Milk Price Hike) आहे. एक लीटर म्हशीचे सुटे दूध रिटेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी महागणार (Mumbai Milk Price Hike) आहेत. होलसेल दरातही 2 रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी दूध विक्रेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. त्यामुळे याचा परिणाम आता दूधाच्या दरावरही होणार आहे. सध्या म्हशीच्या सुटे एक लीटर दूधाचा दर 85 रुपये आहे. हा दर आता 87 रुपये होईल, तर रिटेलला हे दूध 87 ते 88 रुपये होईल.
मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार
एक लिटर म्हशीचे सुटे दुध रिटेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी महागणार तर होलसेल दरातही 2 रुपयाने वाढ होणार आहे. मुंबई शहरात तीन हजाराहून अधिक दूध विक्रेते आहेत. शनिवारी मुंबईतील सर्व दूध विक्रेत्यांची बैठक पार पडली, त्याबैठकीत दूध दरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचे भाव वाढले आहेत. चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. हे पाहता दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
चारा टंचाईचा परिणाम दूध व्यवसायावर
अर्धा पावसाळा संपत आला पण राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झालाय. अनेक भागात चारा टंचाईला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने दांडी मारल्याने ऊस, मका पिकासह अन्य पिकेही काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. त्यामुळे याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.
दूधाच्या दरावर सरकारचं नियंत्रण नाही
मंत्री रुपाला यांनी संसदेत सांगितले की, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग देशातील दुधाच्या दरावर नियंत्रण ठेवत नाही. देशात दूध खरेदी-विक्रीचे नियमन सरकार करत नाही. त्याची किंमत सहकारी आणि खाजगी डेअरी त्यांच्या किंमती आणि बाजार परिस्थितीनुसार निश्चित करतात.
महत्वाच्या इतर बातम्या :