एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

म्हाडाच्या संभाजीनगरमधील 941 घरांच्या लॉटरीचा निकाल उद्या जाहीर होणार, अर्जदारांची उत्सुकता शिगेला

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) गृहनिर्माण व क्षेत्रविकास  मंडळाकडून 941 सदनिका आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर बुधवारी (दि.28) जाहिर करण्यात येणार आहे.

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) गृहनिर्माण व क्षेत्रविकास  मंडळाकडून 941 सदनिका आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर बुधवारी (दि.28) जाहिर करण्यात येणार आहे. छ. संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 941 सदनिका व 361 भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज  नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा "गो लाईव्ह " कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी करण्यात येणार आहे. 

एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापण प्रणाली म्हणजेच (integrated housing lottery management system IHLMS 2.0)  या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस 28 फेब्रुवारी, 2024 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून सुरवात होणार आहे.  IHLMS 2.0 या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे

नोंदणीकरण,अर्ज भरणा, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तसेच सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 हे मोबाइल ऍप स्वरुपात देखील उपलब्ध आहे. अर्जदार अँड्रॉइड (android) फोन मध्ये प्ले स्टोअर आणि आयओएस (ios) प्रणालीच्या  अॅप स्टोर मधून म्हाडा लॉटरी ऍप डाउनलोड करू शकतात. याव्यतिरिक्त  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मंदार वैद्य यांनी केले आहे.  

अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करता येईल 

म्हाडाच्या राज्यातील विविध मंडळांमार्फत जाहीर होणार्याक सोडतींमध्ये सहभाग घेण्यासाठी IHLMS 2.0 या संगणकीय प्रणाली अंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया जरी अमर्याद उपलब्ध असली तरी छ. संभाजीनगर मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीची लिंक दि.27 मार्च, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.  दिनांक  27 मार्च, 2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक   28  मार्च, 2024 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी दिनांक  4 एप्रिल, 2024 रोजी दुपारी ३.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना  दिनांक 7 एप्रिल , 2024   रोजी दुपारी 3.00 पर्यंत ऑनलाइन हरकती नोंदविता येणार आहे.  दिनांक 12 एप्रिल , 2024 रोजी  दुपारी 3.00  वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे  स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे. 

मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे यामध्ये प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत 233 सदनिकांचा समावेश आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 298 सदनिका व 52 भूखंड उपलब्ध असणार आहेत. तसेच छ संभाजी नगर मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत 410 सदनिका व 309 भूखंडांचा समावेश आहे. 

वैद्य यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस  मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray : गुंडांच्या देशा, लाचार देशा, गद्दारांच्या देशा अशी महाराष्ट्राची ओळख बनलीये : उद्धव ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget