Uddhav Thackeray : गुंडांच्या देशा, लाचार देशा, गद्दारांच्या देशा अशी महाराष्ट्राची ओळख बनलीये : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Mumbai : माझं घराणं संपूर्ण महाराष्ट्राच्या आंदोलन उतरलं होतं. मला डोकं वापरायचं आहे खोकं नाही. आपली ओळख काय होती? कणखर देशा, महाराष्ट्र देशा अशी होती. महाराष्ट्राची आज ओळख काय आहे?
Uddhav Thackeray Mumbai : माझं घराणं संपूर्ण महाराष्ट्राच्या आंदोलन उतरलं होतं. मला डोकं वापरायचं आहे खोकं नाही. आपली ओळख काय होती? कणखर देशा, महाराष्ट्र देशा अशी होती. महाराष्ट्राची आज ओळख काय आहे? गुंडांच्या देशा, लाचार देशा, गद्दारांच्या देशा अशी ओळख झाली आहे, असे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. मुंबईतील बर्ला मातोश्री सभागृहात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
ती इंग्रजांची गुलामी होती, आता यांची स्विकारावी लागेल
उद्धव ठाकरे म्हणाले, गरजा जयजयकार क्रांतीचा, क्रांती कोणी करायची? हे वर्ष क्रांतीचं वर्ष आहे. यावर्षी आपण चुकलं तर राज्य सोडा देश संपला म्हणून समजा. ती इंग्रजांची गुलामी होती, आता यांची स्विकारावी लागेल. राज्य करणं म्हणजे सूड उगवणे नव्हे, मात्र हे सांगितलं तर एसआयटी, ईडी मागे लावतात. शिवसेना संपवणे म्हणजे महाराष्ट्र संपवण्याचा डाव आहे, हिंदुत्व संपवण्याचा डाव आहे. आज राज्यात बेरोजगारी वाढत आहेत.रुग्ण मरत आहेत, अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहेत. त्यांना फक्त कंत्राटदारांचे खिसे भरायचे आहेत.
छत्रपतींच्या राज्यावर डाग लावण्याचा प्रयत्न केला त्यांना खाली उतरवणारच असा निश्चय हवा
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, क्रांती करायची असेल तर ताकद सर्वसामान्यांची लागते. छत्रपती नसते तर… मला कोणी म्हटलं शिवसेना प्रमुख आज पाहिजे होते मात्र मग शाहू, फुले देखील आज पाहिजे होते. त्यापेक्षा आज जे त्यांनी दिलं त्याचं आपण काय करणार आहोत, यावर विचार करायला हवा. छत्रपतींच्या राज्यावर डाग लावण्याचा प्रयत्न केला त्यांना खाली उतरवणारच असा निश्चय हवा. अन्यथा त्याला काही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
मग तुमचे लोकं जे देतात ते काय रसगुल्ले देतात?
मध्य प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान बोलले होते की, मला शिव्या दिल्या जातात. मग तुमचे लोकं जे देतात ते काय रसगुल्ले देतात. आम्ही असं नाही बोलत, शिव्या आपण देतोय हे त्यांना कळत नाही.
आम्ही असं पंतप्रधान यांच्याबद्दल बोललो नाही, आणि बोलणार पण नाही. मुंगी देखील माती नव्हे तर साखर खाते, असेही ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या