एक्स्प्लोर

Mhada: म्हाडाला मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मुहूर्त मिळेना? सोडत जाहीर होत नसल्याने अर्जदार संतप्त

 गिरणी कामगारांसाठीच्या रखडलेल्या 2521 घरांची सोडत लवकरच निघाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.

मुंबई : म्हाडाने (Mhada)  मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.  सोडत जाहीर होत नसल्याने मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेले अर्जदार संतप्त आहेत. अर्जदारांकडून म्हाडाला एकूण  519 कोटी रुपयांची अनामत रक्कम मिळाली आहे.  म्हाडाने यापूर्वी 18 जुलै रोजी सोडत काढण्याची घोषणा केली होती, परंतु अर्जाची अंतिम मुदत वाढवून सोडत पुढे ढकलली. अजूनही म्हाडाने नवीन सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्ज केलेले एक लाखाहून अधिक अर्जदार सोडतीची तारीख जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

म्हाडा मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जुलैला संपली आहे. म्हाडाने यापूर्वी 18 जुलै रोजी सोडत काढण्याची घोषणा केली होती, परंतु अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून सोडत सोडतही पुढे ढकलली. मात्र अजूनही म्हाडाने नवीन सोडतीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.  त्यामुळे अर्ज केलेले एक लाखाहून अधिक अर्जदार सोडतीची तारीख जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत,होणाऱ्या विलंबामुळे अर्जदार आपला रोष समाज माध्यमावर मांडत आहेत. 

गिरणी कामगारांसाठीच्या 2521 घरांची सोडत लवकरच निघणार

 गिरणी कामगारांसाठीच्या रखडलेल्या 2521 घरांची सोडत लवकरच निघाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसंच या यादीमधील कामगारांचा या सोडतीत सहभाग असेल. रांजनोळीतील 1 हजार 244 घरांची दूरवस्था झाली असून या घरांची दुरुस्ती नेमकी कोण करणार यावरून वाद सुरू आहे. तरीही म्हाडाने रांजनोळीसह उपलब्ध 2521 घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतलाय.  

कोणत्या गटासाठी किती प्रतिसाद? 

मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या 4082 सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश आहे.  प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता 22 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांसाठी 28 हजार 862 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. या ठिकाणी 415 घरे आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60 हजार 522 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगाव या योजनेकरिता आहेत. या ठिकाणी 416 घरे आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2068 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोळी कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता असल्याची माहिती म्हाडाच्यावतीने देण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget