एक्स्प्लोर
डोंबिवलीत तरुण व्यापाऱ्याचा खड्डयामुळे मृत्यू
डोंबिवलीत खड्ड्यामुळे 33 वर्षीय व्यापाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ललित संघवी असं या तरुण व्यापाऱ्याचं नाव आहे.

डोंबिवली : डोंबिवलीत खड्ड्यामुळे 33 वर्षीय व्यापाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ललित संघवी असं या तरुण व्यापाऱ्याचं नाव आहे. डोंबिवलीच्या खंबाळपाडा-एमआयडीसी रोडवर संघवी यांचं मार्बलचं दुकान आह. २३ ऑगस्ट रोजी दुचाकीवरुन जात असताना संघवी यांचा खड्डा चुकवताना अपघात झाला. आज उपचारादरम्यान संघवी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा रस्ता पालिकेच्या ताब्यात येतो की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यावरुन वाद सुरु झाला असून कोणीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक























