एक्स्प्लोर
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : अभियांत्रिकी कामांसाठी आज मध्य आणि हार्बर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वे रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या मेगाब्लॉकदरम्यान डाऊन जलद मार्गावरील गाड्या ठाण्यानंतर डाऊन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.
तसेच सकाळी 9.25 ते दुपारी 2.54 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
दुसरीकडे हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्याम हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.
या मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी टर्मिन्स येथून पनवेल आणि अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement