एक्स्प्लोर
मुंबई लोकल : तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई : मुंबईतील पश्चिम, मध्ये आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजण्यादरम्यान हा मेगाब्लॉक असेल.
पश्चिम रेल्वे :
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान, सर्व फास्ट लोकल या दोन्ही स्थानकांदरम्यान स्लो मार्गावरुन चालवल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वे :
मध्ये रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट लोकल सकाळी 11 ते दुपारी 4.21 दरम्यान ठाणे स्टेशनवरुन अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील. शिवाय, ठाणे ते सीएसटीएमपर्यंत अप फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल गाड्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा येथे थांबा देण्यात येईल. मात्र, गाड्या 20 मिनिटं उशिराने धावतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजरला दिवा स्टेशनला अंतिम थांबा देण्यात येईल. परतीच्या मार्गासाठी रत्नागिरी-दादर पॅसेंजर पॅसेंजर दिव्याहून सुटेल. मेगाब्लॉकच्या कालावधीत एक्स्प्रेस, मेल 20 ते 30 मिनिटं उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे :
हार्बर रेल्वेमार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसटीएम ते पनवेल, बेलापूर, वाशी आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएमटीएम या सेवा सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 कालावधीत बंद राहणार आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सीएसटीएम ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement