Railway Megablock | मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशीदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशीदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर सकाळी 11.20 वाजेपासून दुपारी 3.50 वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान कल्याण ते ठाणेदरम्यान सर्व गाड्या अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील व ठाण्यापर्यंत सर्व मागांवर थांबतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्ग मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकदरम्यान बोरिवली ते वसई-विरार दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे येणारी सर्व उपनगरी रेल्वे सेवा बंद असेल. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करत येणार आहे.