एक्स्प्लोर
पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री, तर मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
अभियांत्रिकी कामांसाठी दर रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर मात्र आज रात्रीच घेण्यात येणार आहे. तर मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने दोन्ही मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई : अभियांत्रिकी कामांसाठी दर रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर मात्र आज रात्रीच घेण्यात येणार आहे. तर मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने दोन्ही मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद आणि धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेटवरुन बोरिवली, विरारकडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द कऱण्यात आल्या आहेत.
तर उद्या रविवारी मध्य रेल्वेवर मार्गासह हार्बर मार्गावर मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याण-ठाणे दरम्यान धिम्यागतीच्या सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
या लोकलना ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा स्टेशनदरम्यान थांबा देण्यात येणार नाही. त्यामुळे या प्रवाशांना ठाणे किंवा डोंबिवलीला उतरुन उलटा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते पनवेल, वाशी बेलापूर दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच सीएसटीहून वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्याही याकाळात रद्द करण्यात आल्या आहेत.
या मेगाब्लॉक काळात कुर्ला स्थानकात पनवेल, बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील सीएसटी ते वांद्रे स्थानकादरम्यानही लोकल बंद राहणार असल्याने, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दादर मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement