एक्स्प्लोर
कुत्र्याची हत्या, मारेकऱ्यांना शोधा, मीरारोडच्या तरुणीचं मोदींना ट्वीट
वसई : टायसनला कुणी मारलं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थेट पंतप्रधानांना साकडं घालण्यात आलं आहे. टायसन हा मनुष्य नसला तरी मुंबईजवळ काशीमिरा भागातील रहिवाशांसाठी तो प्राणापेक्षा जवळचा आहे. टायसन या कुत्र्याचा अकस्मात मृत्यू झाल्याचं रहिवाशांनी सांगितलं आहे.
मुंबईतील काशीमिरा परिसरातल्या पूजा सोसायटीमध्ये वावरणारा टायसन हा कुत्रा 23 ऑगस्टला मृतावस्थेत आढळला. पण त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून, त्याची कुणी तरी हत्या केल्याचा संशय रहिवाशांना आहे.
याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पण पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे हताश झालेल्या रहिवाशांनी थेट पंतप्रधानांना ट्वीट करुन याबाबत कारवाईची मागणी केली आहे.
'आमच्या कुत्र्याच्या हत्येची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी.' अशी मागणी ऋतुजा भोसले नामक महिलेने ट्वीटवर केली आहे. सोसायटीत राहणाऱ्या पाच जणांची नावंही महिलेने तक्रारीत लिहीली आहेत.
https://twitter.com/RitujaBhosle/status/771322117233270784
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement