एक्स्प्लोर

हिजाबसाठी कॉलेजविरोधात लढणारी विद्यार्थिनी पुन्हा हायकोर्टात!

हिजाब घालण्यास बंदी घालणाऱ्या महाविद्यालयाविरोधात याच विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई : हिजाबसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थिनाला आता कमी हजेरी असल्याच्या कारणावरुन परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात राहणाऱ्या या विद्यार्थिनीने भिवंडीतील महाविद्यालयाविरोधात पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. हिजाब घालण्यास बंदी घालणाऱ्या महाविद्यालयाविरोधात याच विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या विद्यार्थिनीने हायकोर्टात नव्याने याचिका दाखल करत आपल्याला पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. ज्यावर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. कॉलेजकडून परीक्षेला बसण्यास मनाई भिवंडीतील साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने या विद्यार्थिनीला 1 जूनपासून सुरु होणाऱ्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. यासाठी तिची हजेरी कमी असल्याचं कारण पुढे करण्यात आलं आहे. मात्र विद्यार्थिनीने आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, या कॉलेजमध्ये हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थिनींवर दबाव आणला जातो आणि प्रसंगी धमकावलंही जातं. एकतर हिजाब घाला किंवा वर्गात बसा, असं कॉलेजतर्फे स्पष्ट सांगण्यात आलं. याला कंटाळून अनेक विद्यार्थिनींनी कॉलेज सोडून घरी बसणं पसंत केलं. मात्र कॉलेजला विरोध करत या विद्यार्थिनीने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट तिलाच कॉलेज सोडण्यास सांगण्यात आलं. कॉलेजचं स्पष्टीकरण यावर कॉलेजने आपली बाजू स्पष्ट करताना म्हटलंय की, त्यांचा हिजाबला विरोध नाही मात्र विद्यार्थी जर पूर्ण बुरखा घालून महाविद्यालयात वावरण्याचा अट्टहास करत असतील तर ते चुकीचं आहे. याशिवाय वैद्यकीय शाखेत शिकताना जर तुम्ही मेडिकल अॅप्रन योग्य प्रकारे घालणार नाही तर कसं चालेल? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. हिजाबविरोधात उच्च न्यायालयात याचिका याबाबत विद्यार्थिनीने याविरोधात केंद्र सरकारकडे 11 जानेवारी 2017 रोजी तक्रार केली होती. 20 जानेवारी 2017 रोजी केंद्र सरकारने कॉलेजचा हा दबाव बेकायदेशीर असल्याचं सांगत, कॉलेजला यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. यालाही दाद न दिल्याने विद्यार्थिनीच्या वडिलांनी मार्च 2017 मध्ये राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडेही याची तक्रार केली. त्यानंतर जून 2017 मध्ये कॉलेजने आमच्याकडे विद्यार्थ्यांना 'ड्रेसकोड' सक्तीचा असल्याचा दाखला देत या विद्यार्थिनीची विनंती मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतरही अनेकदा विनंती करुनही हिजाब घालून या विद्यार्थिनीला कॉलेजमध्ये येण्याची परवानगी नाकारण्यात आली. मग ऑक्टोबर 2017 मध्ये मानवाधिकार आयोगातही याबाबत पालकांकडून तक्रार दाखल करण्यात आली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. अखेरीस मार्च 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाच्या दणक्यानंतर या विद्यार्थिनीला हिजाब घालून प्रवेश देण्यात आला. मात्र आता कॉलेजने वर्षभरात कमी हजेरी असल्याच्या कारणावरुन कायद्याने तिला परीक्षेला बसता येणार नाही, असं स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget