एक्स्प्लोर
इकबाल कासकरविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई
इकबाल खंडणीच्या प्रकरणात ठाण्यातील कारागृहात सजा भोगत आहे.

ठाणे : दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याच्या विरोधात ठाणे पोलिसांनी मोक्का अन्वये कारवाई केली आहे. इकबाल खंडणीच्या प्रकरणात ठाण्यातील कारागृहात सजा भोगत आहे.
ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात इकबालच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या बरोबरच त्याचे साथीदार ईस्रार सय्यद आणि मुमताज शेख याच्या बरोबरच मटका किंग पंकज गांगर याच्या विरोधात राज्य संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती कदम करणार आहेत. तसेच या प्रकरणात भविष्यात कोणी आढळले तयार त्यांच्यावर देखील मोक्काअन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























