एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एलफिन्स्टनच्या दुर्घटनेदिवशी मुंबई महापौरांची फुटबॉल खेळाडूंसाठी मेजवानी
29 सप्टेंबरच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या गरबा खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. तर त्याच दिवशी महापौर बंगल्यावर परदेशातून आलेल्या फुटबॉल खेळाडूंसाठी मेजवानी ठेवण्यात आली होती.
मुंबई : एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या 23 प्रवाशांच्या नातेवाईकांचे अश्रूही सुकले नव्हते, तोच स्वतःला मुंबईचे कैवारी म्हणवून घेणारे नेते वेगवेगळं सेलिब्रेशन करण्यात मश्गूल असल्याचं समोर आलं आहे.
29 सप्टेंबरच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या गरबा खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. तर त्याच दिवशी महापौर बंगल्यावर परदेशातून आलेल्या फुटबॉल खेळाडूंसाठी मेजवानी ठेवण्यात आली होती.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी महापौर बंगल्यावरच्या पार्टीवर जोरदार टीका केली. एककीडे संपूर्ण मुंबई शोकात आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईकरांना धीर देण्याऐवजी, भाजप आणि शिवसेनेकडून सुरू असलेलं राजकारण मुंबईच्या जखमांवर मीठ चोळणार आहे.
या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, “प्रत्येक राजकीय पक्षातील संवेदनशील नेत्यानं अशाप्रकारच्या घटनेनंतर आपली संवेदना दाखवलीच पाहिजे. गरबा खेळणाऱ्या नेत्यांनी आपली संवेदना जागृत ठेवून गरबा खेळावा. आणि परदेशी फुटबॉल खेळाडूंना महापौर बंगल्यात मेजवानी देताना ही संवेदना दाखवलीच पाहिजे.”
दरम्यान, एलफिन्स्टन दुर्घटनेदिवशी भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या गरबा खेळतानाच्या व्हिडीओवरुन सर्वच स्तरातून टीकेची झोड उठते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
संबंधित बातम्या
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रात्री किरीट सोमय्या गरबा खेळत होते?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement