एक्स्प्लोर
Advertisement
धारावी आता लॉकडाऊन झाली पाहिजे : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईवरील मोठे संकट रोखण्यासाठी धारावीत कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. धारावीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची मागणी याआधीही लोकप्रतिनिधींनी केली आहे.
मुंबई: मुंबईतील धारावी परिसर आता लॉकडाऊन झाला पाहिजे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या की, धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिसरात लहान घर आहेत. लोकं थोडं बाहेर बसली तरी चालेल पण लोकांनी सहकार्य करायला हवं. सरकार जेवण देत तरी लोक घराबाहेर पडतात. बायका भाजी घ्यायला जातात. तुम्ही तुमच्या घरच्यांना, कुटुंबियांना, संपूर्ण इमारतीला धोका पसरवत आहेत, असं पेडणेकर म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, जेवण दिलं तरी खाऊन पिऊन लोकं का बाहेर पडत आहेत. आम्ही काम करतोय लोकांनी घरी राहावे जबाबदारी पाळावी, असं देखील त्या म्हणाल्या.
धारावी पोलिसांची अनोखी शक्कल
धारावी परिसरात लोकं सांगून देखील घराबाहेर पडत आहेत. यासाठी धारावीमध्ये पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. भाजी घ्यायची, बँकेत जायचं अशी जुजबी कारण सांगून फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडून 10 मिनिटं उन्हात रस्त्यावर बसवलं. पोलिस यावेळी त्यांची माहिती पोलीस घेतात आणि दहा मिनिटाने नागरिकांना सोडण्यात येत आहे.
Coronavrius | धारावीत कोरोनाला कसं रोखणार? धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
धारावी पूर्णतः लॉकडाऊन करा: खासदार राहुल शेवाळे
मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने मुंबईतील काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. या पार्श्वभूमीवर धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यापूर्वीच केली आहे. मुंबईवरील मोठे संकट रोखण्यासाठी धारावीत कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.धारावीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची लेखी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच, मुंबईला कोरोनाच्या मोठया संकटापासून वाचविण्यासाठी धारावीमध्ये आणखी काही कठोर उपाययोजना करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.धारावीतील प्रादुर्भाव वेळीच रोखला गेला नाही तर या परिसरावर आणि पर्यायाने मुंबईवर मोठे संकट येईल, असा इशाराही खासदारांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :
कळव्यात पूर्णतः शट डाऊन; फक्त मेडिकलची दुकाने सुरु राहणार
मुंबईतील 'कोरोना'चे हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'मातोश्री'ही गंभीर स्थितीतील विभागात ..तर, मुंबईतील भाजीमंडई बंद करणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशाराअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement