एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची धग आता मुंबईतही, आमदार-खासदारांना शहरात फिरू न देण्याचा इशारा

Maratha Reservation In Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर साकारात्कमक तोडगा काढण्याचा निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून मुंबईतही राजकीय कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) लोण राज्यभरात पसरत असताना आता मुंबईतही आंदोलनाची धग तीव्र होतांना दिसत आहे. राज्यभरात सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी होत असताना आता मुंबईतही आमदार-खासदारांना फिरू न देण्याचा इशारा सकल मराठा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणे आता मुंबईतही राजकारण्यांना बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण करण्यात आले. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) मुंबई युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी सकल मराठा मोर्चाच्या वतीने राजकारण्यांना इशारा दिला आहे. मुंबईत सोमवारी (30 ऑक्टोबर) रोजी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर साकारात्कमक तोडगा काढण्याचा निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून मुंबईतही राजकीय कार्यक्रम उधळून लावण्याची घोषणा केली आहे. 

स्वतःच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना ही याबाबत सूचित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राजकीय कार्यकर्तेही मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अराजकीय भूमिका घेऊन आंदोलनात उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगेचं आवाहन

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना म्हटलं की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल.  राजीनामे देण्या पेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकार ला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही. 

मराठा आंदोलनाला केरळमधून पाठिंबा 

जालन्यात मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय. इतकंच नव्हे तर केरळ राज्यातून देखील मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसत आहे. केरळमध्ये मराठा वेल्फेअर असोसिएशन तर्फे एक छोटेखानी सभा घेऊन. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळेस मराठा वेल्फेअर असोसिएशन तर्फे अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष अधिक मोरे सेक्रेटरी तानाजी धनावडे खजिनदार पोपट शिंदे, मोहन शेठ, संजय शेठ, सुरेश सुर्वे, संभाजी शेठ राजू शेठ, उत्तम शेठ उपस्थित होते.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget