एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मनोज कोटक यांच्या वर्णीची चिन्हं
भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार एकाच व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपद देता येत नाही. त्यामुळे आशिष शेलारांनंतर पर्यायी नावाचा विचार सुरु आहे
मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मनोज कोटक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांची दुसरी टर्म पुढच्या महिन्यात संपणार असल्याने कोटक यांची निवड होण्याची शक्यता आहे. मनोज कोटक यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून रिंगणात उतरणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार एकाच व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपद देता येत नाही. मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांची दुसरी टर्म पुढच्या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे शेलार यांच्या जागी पर्यायी नावांचा विचार सुरु आहे.
मनोज कोटक हे सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे गटनेते आहेत. महापालिकेतील कामगिरीमुळे कोटक यांचं नाव आघाडीवर आहे.
मनोज कोटक हे भाजपचे ईशान्य मुंबईतील लोकसभा उमेदवार आहेत.
VIDEO | माझा 20-20 | महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा | एबीपी माझा
युतीमधील ईशान्य मुंबईच्या उमेदवारीचा तिढा संपता संपत नव्हता. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यानंतर भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली.
मनोज कोटक हा डायनॅमिक उमेदवार असून टॉप दहा निकालात त्यांचा निकाल लागेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी नाराजी लपवत व्यक्त केली होती.
किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर मनोज कोटक
मनोज कोटक यांचा परिचय मुंबईत भाजपचे मुलुंड मधील विद्यमान नगरसेवक मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी 2014 साली भांडुप विधानसभेतून निवडणूक लढवली होती मनोज कोटक मुलुंडचेच रहिवासी असल्यामुळे किरीट सोमय्या यांना मुलुंड मध्येच आव्हान उभं ठाकलं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांच्या उमेदवारीस स्थानिक शिवसेनेचं समर्थनअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
क्राईम
Advertisement