एक्स्प्लोर

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब

पोलिसांनी आरोपींना बुधवारी कोर्टात हजर न केल्यानं ही सुनावणी होऊ शकली नाही. मागील सुनावणीत सरकारी पक्षानं या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून याच जेलमधील कैदी भाग्यश्री मांडवकरला हजर केलं होतं. या साक्षीदारानं आरोपींनीच मंजुळा शेट्येला मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचं कोर्टात सांगितलं होतं.

मुंबई : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे. काही कारणास्तव पोलिसांनी आरोपींना बुधवारी कोर्टात हजर न केल्यानं ही सुनावणी होऊ शकली नाही. मागील सुनावणीत सरकारी पक्षानं या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून याच जेलमधील कैदी भाग्यश्री मांडवकरला हजर केलं होतं. या साक्षीदारानं आरोपींनीच मंजुळा शेट्येला मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचं कोर्टात सांगितलं होतं. जेलर मनिषा पोखरकर या जेलमध्ये आपली सत्ता गाजवत असत. कैद्यांना छळण्यासाठी त्या स्वत:चे तुघलकी नियम बनवत असत असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं. मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह 6 जणांविरोधात आरोप निश्चित केलेत. कलम 302 नुसार हत्याकरणे, कलम 120 ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलंमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आलेत. जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या 6 जेल पोलिसांनी हेतुपुरस्कर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येची हत्याच झाली होती, असं क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आलं असून साक्षीदार आणि वस्तूजन्य पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाल्याचे मुंबई क्राईम ब्रांचने आपल्या आरोपपत्रात नमूद केलं आहे. 23 जूनच्या रात्री मंजुळा शेट्ये या महिला कैद्याला अमानुष मारहाण करण्यात आली. यातच तिचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या महिला जेल पोलीस अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना होती की, आपण जे कृत्य करतोय त्यामुळे एखादी गंभीर घटना घडू शकते. असं असतानाही मंजुळाला मारहाण करण्यात आली. तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच मंजुळाला मारहाण करण्यात आली, असं आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे क्राईम ब्रांचनं म्हटलं आहे. एकूण 990 पानांचे हे आरोपपत्र असून यात 182 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून यात 97 कैद्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जबाब या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही फुटेज हे या प्रकरणात महत्वाचा पुरावा असल्याचंही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget