एक्स्प्लोर
पीठासीन अधिकारी असतानाही माणिकराव ठाकरेंची विरोधकांच्या बैठकीत हजेरी
![पीठासीन अधिकारी असतानाही माणिकराव ठाकरेंची विरोधकांच्या बैठकीत हजेरी Manikrao Thackeray Attend Oppositions Meeting पीठासीन अधिकारी असतानाही माणिकराव ठाकरेंची विरोधकांच्या बैठकीत हजेरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/02/26210505/manikrao.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विरोधकांच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माणिकराव ठाकरे हे पीठासीन अधिकारी आहेत. पीठासन अधिकाऱ्याने अशाप्रकारे हजेरी लावण्याची संसदीय कामकाजाची परंपरा नाही.
माणिकराव ठाकरे हे विधानपरिषदेचे उपसभापती आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीत हजेरी लावून, माणिकरावांनी परंपरेला छेद दिल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
संसदीय कामकाज मंत्री काय म्हणाले?
विरोधकांच्या बैठकीला पीठासीन अधिकारी असलेल्या व्यक्तीने उपस्थिती लावू नये, असे कायद्यात कुठेही लिहिले नाही. मात्र, आतापर्यंतची परंपरा आणि संकेत असे आहेत की, पीठासीन अधिकारी विरोधकांच्या बैठकीला उपस्थिती लावत नाही. ते नैतिकदृष्टी चूक आहे, असे मत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)