एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रेन आली, रुळावर झोपला, ट्रेन गेली-उठून पळाला!
आत्महत्येसाठी रुळावर झोपला, मात्र आख्खी ट्रेन अंगावरुन जाऊनही साधं खरचटलंही नाही.
मुंबई: रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र कुर्ल्यात अजब घटना घडली. ही घटना आत्महत्येचा प्रयत्न फसल्याची होती.
आत्महत्येसाठी रुळावर झोपला, मात्र आख्खी ट्रेन अंगावरुन जाऊनही साधं खरचटलंही नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काल रविवार असल्यामुळे कुर्ला स्टेशनवर तुलनेने कमी गर्दी होती. सर्व प्रवासी आपआपल्या कामात व्यस्त होते. तितक्यात दुपारी चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर पाचवर एक एक्स्प्रेस ट्रेन आली.
त्यावेळी आत्महत्येच्या उद्देशाने एक व्यक्ती थेट त्या ट्रेनच्या समोर ट्रॅकवर झोपला. क्षणार्धात ट्रेन त्याच्या अंगावरुन पास झाली. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांचं लक्ष त्या व्यक्तीकडे एकवटलं होतं. ती व्यक्ती रेल्वेखाली चिरडली असणार असाच सर्वांचा अंदाज होता.
मात्र ट्रेन पास झाल्यानंतर ती व्यक्ती उठून उभी राहिली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती कोण?
दरम्यान, या सर्वप्रकारानंतर आरपीएफ जवानांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. विश्वास गुलाब बनसोडे असं या व्यक्तीचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे विश्वास स्वत: रेल्वे कर्मचारी आहे. ते इगतपुरी इथं इलेक्ट्रिकल मेंटनन्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात.
त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलं नाही. आरपीएफच्या जवानांनी विश्वास यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement