एक्स्प्लोर
भाच्याचं अपहरण करुन हत्या, संशयास्पद फेसबुक पोस्ट डिलीट
मुंबई : मुंबईत एका व्यक्तीनं आपल्या फेसबुक पेजवर भाच्याचं अपहरण करुन हत्या झाल्याची माहिती टाकली. मात्र ही पोस्ट पाहून पोलिसांनी चौकशी केली असता असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं उघड झालं आहे.
मुंबईत राहणाऱ्या जाईन शेख या व्यक्तीनं आपल्या फेसबुक प्रोफाइलवर भाच्याचा फोटो टाकला. एका इनोव्हा गाडीचा फोटो टाकून गेल्या 18 तासांपासून भाचा बेपत्ता असल्याची माहिती त्याने लिहिली. आमचा ड्रायव्हर भाच्याला सोडण्यासाठी बहिणीच्या घरी निघाला, मात्र 18 तास उलटूनही भाचा घरी पोहचलेला नाही. दादरजवळ आमची इनोव्हा सापडली, मात्र भाच्याचा पत्ता नसल्याचं त्याने लिहिलं.
ही पोस्ट व्हायरल होताच पोलिसांनी या गाडीचा आणि बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेताच जाईन शेख यांनी हे फोटो आणि पोस्ट फेसबुकवरुन हटवलं. त्यामुळे केवळ पोलिसांना त्रास देण्यासाठी तर ही पोस्ट टाकली नसावी ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी फेसबुककडूनही अधिक माहिती मागवली असून पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जाईन शेख, त्यांचा भाचा आणि कथित अपहरण याभोवतीचं गूढ वाढलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement